पुणे : दिवसभरातील आकडा 400च्या पुढे सरकला

पुणे – सलग दुसऱ्या दिवशी शहरातील बाधित संख्या वाढली असून, आज दिवसभरात नवीन 411 बाधित सापडले आहेत. मागील एक महिन्यानंतर पहिल्यांदाच बाधित संख्या चारशेच्या पुढे गेल्याचे पाहायला मिळत आहे. ही वाढती संख्या प्रशासनाची चिंता वाढवत आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात 6 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, शहरातील एकूण मृत्युसंख्या 4 हजार 407 वर पोहोचली आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दररोजची बाधित संख्या तब्बल 1800 ते 2000पर्यंत पोहोचलेली होती. ऑक्‍टोबर महिन्यात करोनाची लाट ओसरायला लागली. 18 ऑक्‍टोबरला बाधित संख्या 400च्या खाली आली होती. त्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दररोजची बाधित संख्या पावणे अडीचशे ते साडेतीन हजाराच्या आसपास होती.

तर, गेल्या दहा दिवसांत (दि. 16 नोव्हेंबर) ही संख्या तब्बल सव्वाशेपर्यंत खाली आल्याचे दिसून आले. मात्र, एक महिन्याच्या दिलासानंतर आता बाधितांच्या वाढत्या संख्येने चिंता वाढवली आहे.

गेल्या 24 तासांत सक्रिय बाधितांची संख्या 200ने वाढली आहे. 4 हजार 475 बाधितांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील 385 बाधितांची प्रकृती चिंताजनक आहे. 250 बाधित व्हेंटिलेटर तर 135 जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.