पुणे – दि.17, 18 एप्रिल रोजी एमएचटी-सीईटी सराव परीक्षा

19 केंद्र निश्‍चित : पहिल्यांदाच ऑनलाइन परीक्षा असल्याने होणार सराव

पुणे – एमएचटी-सीईटी सराव परीक्षा पुण्यात 17 ते 18 एप्रिल रोजी शहरातील 19 केंद्रावर होणार आहे. पुणे जिह्यातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे केंद्र जाहीर करण्यात आले असून, त्याबाबतचे वेळापत्रक राज्य सीईटी सेलने आज संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ऍग्रिकल्चर या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी पहिल्यांदाच ऑनलाइन एमएचटी-सीईटी सराव परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा दि.2 ते 13 मे या दरम्यान होत आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन संगणक आधारित परीक्षेचा सरावा व्हावा, या उद्देशाने ही सराव परीक्षा राज्यभरात घेण्यात येत आहे.

राज्य सीईटी सेलमार्फत एमएचटी-सीईटी परीक्षा राबविण्यात येत आहे. त्यांच्यामार्फत सराव परीक्षा घेण्यात येत आहे. सराव परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनाच ही परीक्षा देता येणार आहे. विद्यार्थ्यांनी संबंधित केंद्रावर जाऊन सराव परीक्षा द्यावी, असे आवाहन राज्य सीईटी सेलने केले आहे.

परीक्षेसाठी पुढील गोष्टी आवश्‍यक
* परीक्षेसाठी पूर्ण चार्ज केलेला स्मार्टफोन हवा
* बारावी परीक्षेचे मूळ हॉल तिकीट हवे
* बॉल पॉईंट पेन, कोरा कागद
* विद्यार्थ्यांनी किमान 30 मिनिटे आधी उपस्थित
* उशिरा येणाऱ्यास प्रवेश नाही

सराव परीक्षेचे परीक्षा केंद्र
दि. 17 एप्रिल : सुमन रमेश तुलसीअनी टेक्‍निकल कॅम्पस, डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग ऍन्ड टेक्‍नॉलॉजी (चऱ्होली), मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्‌ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट, विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट, एमबीएम सिंहगड टेक्‍निकल इन्स्टिट्यूट

दि. 18 एप्रिल : एसव्हीपीएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्‍नॉलॉजी, विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड मॅनेजमेंट, जेएसपीएम राजर्षी शाहू महाराज ऑफ इंजिनिअरिंग, पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, एमईएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, एस.बी पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड मॅनेजमंट रिसर्च.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.