पुणे : न्यायालयातून पळवून नेलेली पिडीत मुलगी सापडली

पळवून नेणारा रिक्षाचालक जेरबंद
पुणे :
शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून पळवून नेण्यात आलेली मुलगी कात्रज चौकात सापडली आहे. तीला पळवून नेणाऱ्या रिक्षा चालकासही भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. पिडीत मुलीला 17 जानेवारी रोजी पळवून नेण्यात आल्यानंतर मोठी खळबळ माजली. याप्रकरणी पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली करण्यात आली होती.

प्रकाश सोमीनाथ मरबे(23,रा.कोंढवा) असे अटक आरोपीचे नाव आहे. पिटाच्या गुन्हयामध्ये पिडीत मुलीला न्यायालयात पोलीस निरीक्षक व त्याच्या पथकाने हजर करण्यासाठी आणले होते. यावेळी स्वच्छतागृहात गेल्यावर खिडकीतून उडी मारुन पळून गेली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पिडीत मुलीचा शोध घेत असताना ती कात्रज चौकात येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार तीला ताब्यात घेण्यात आले. तीच्याकडे चौकशी केली असता, तीने प्रकाश मरबे याने पळवून नेल्याचे सांगितले. त्यानूसार त्याला ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई उपायुक्त सागर पाटील, सहायक उपायुक्त सर्जेराव बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, प्रकाश पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलीस अंमलदार रविंद्र भोसले, अण्णासाहेब माडिवाले, संतोष भापकर, सोमनाथ सुतार, गणेश सुतार सर्फराज देशमुख, समिर बागशिराज, सचिन पवार, अभिजित जाधव, गणेश शेंडे,राहुल तांबे व विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.