पुणे – लसीकरण नियमांच्या गोंधळामुळे बंद असलेले 45 वर्षे वयापुढील नागरिकांचे पहिल्या डोसचे लसीकरण गुरूवारपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी 48 केंद्रांवर नियोजन केले आहे.
48 केंद्रातील प्रत्येक केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध असणार आहेत. येथे उपलब्ध साठ्यापैकी 60 टक्के लस या ऑनलाइन अपॉईंटमेंट/स्लॉट बुक केलेल्या नागरिकांना पहिला डोस दिला जाईल. यासाठी ऑनलाइन अपॉईंटमेंट बुकिंग सकाळी 8 वाजता सुरू होईल. याशिवाय ज्यांनी नोंदणी केली नाही अशा नागरिकांसाठी 20 टक्के लस राखीव ठेवण्यात येईल.
ज्या नागरिकांचे कोवॅक्सिन चे दुसरे डोस असतील त्यांना गुरूवारी दुसरा डोस दिला जाईल. ज्यांनी 22 एप्रिलपूर्वी कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे त्यांनाच दुसरा डोस देण्यात येईल, असे पालिकेने सांगितले आहे.