पुणे – महिलेला फेसबुक फ्रेंडने घातला 51 हजारांचा गंडा

पुणे – एका महिलेला तिच्या फेसबुक फ्रेंडने 51 हजाराचा गंडा घातला. भेटवस्तू कस्टमने पकडली असल्याचा बहाणा करत ही रक्‍कम उकळण्यात आली. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात अज्ञात फेसबुकधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोथरूड येथे राहणाऱ्या एका 48 वर्षीय महिलेची फेसबुकवर एकाशी ओळख झाली होती. त्याने परदेशात असल्याचे सांगत व्हॉट्‌सऍपवरही वारंवार संपर्क साधला होता. यानंतर त्याने फिर्यादीचा विश्‍वास संपादन करुन भारतात गिफ्ट पाठवले असल्याचे सांगितले. त्याकरिता मोबाइलवरून 30 हजार रुपये एक्‍साईज चार्ज ऑनलाइन देण्यास सांगितला. यानंतर त्याने स्वत: भारतात भेटण्यासाठी आल्याचा बहाणा केला. यानंतर फिर्यादीला सर्व सामान कस्टमने पकडले असून यलोकार्ड एमीग्रेशन फीसाठी 21 हजार रुपये भरण्यास सांगितले. याप्रकारे 51 हजार रुपये ऑनलाइन भरण्यास सांगून फिर्यादी महिलेची फसवणूक केली. पैसे भरल्यानंतर त्याने मोबाइल बंद ठेवला तसेच संपर्क बंद केला. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजेश तटकरे करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here