पुणे – दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी जाताना घराचा दरवाजा उघडा ठेवणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. चोरट्यांनी तीच्या घरातील लक्ष्मीपुजनासाठी ठेवलेले साडेचार लाखाचे दागिने आणि 10 हजाराची रोकड चोरुन नेली. ही घटना सहकारनगर येथे घडली.
याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनुसार फिर्यादीची पत्नी दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी जाताना घराचा दरवाजा उघडा ठेऊन गेली होती. घरातील सदस्य झोपेत असताना चोरट्यांनी लक्ष्मीपुजनासाठी ठेवलेले 18 तोळ्यांचे दागिने आणी रोकड चोरुन नेली.
ही घटना धनकवडी, गणेशनगर येथील सुमंगल कार्यालयामागे घडली. तर बिबवेवाडी येथे घडलेल्या एका घटनेत न्यु पदमावती येथे घराचा दरवाजाचा नजरचुकीने अर्धवट उघडा असल्याची संधी साधत चोरट्यांनी 15 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन चोरुन नेला.
दरम्यान दरवाजाच्या फटीतून प्रवेश करुन घरातील 75 हजार रुपयांचे दागिने आणि मोबाईल चोरण्यात आला. ही घटना येरवडा येथील लक्ष्मीनगर येथे घडली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात कमल कदम(65,रा.लक्ष्मीनारायण, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे.
लोणीकाळभोर येथील दुसऱ्या एका घटनेत घरातील कडी कोयंडा उचकटून 1 लाख 79 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणी चांदीचे दागिने असा ऐवज लक्ष्मीपुजनाच्या दिवशी चोरण्यात आला. याप्रकरणी विनायक शितोळे (69,रा.शितोळे वस्ती, हवेली ) यांनी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.