शहराचा पारा 11.9 अंश सेल्सियसवर
पुणे – मागील आठवडाभरात तापमान 8 अंशांपर्यंत घसरले होते. मात्र, शुक्रवारी तापमानात काहीशी वाढ झाल्याने, थंडी ओसरत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. शुक्रवारी पुण्याचे किमान तापमान 11.9 अंश सेल्सियस नोंदवले गेले.
मागील 24 तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. मराठवाड्याच्या बऱ्याच भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या बऱ्याच भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.
राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सर्वात 9.4 अंश सेल्सिअस इतके कमी किमान तापमान गोंदिया येथे नोंदवले आहे.
मागील 24 तासांत पुणे येथे 28.9 अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान आणि 11.9 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले आहे.