पुणे – येरवडा परिसरातून मागील आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी संध्याकाळी मांजरी रेल्वे फाटकाजवळ आढळल्याने एकाच खळबळ उडाली. हा खुनाचा प्रकारा असल्याचे प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान मृत हा मुंबईतील एका मोठ्या गॅंगस्टरचा नातेवाईक असल्याची चर्चा सुरु होता. मात्र पोलिसांनी अद्याप त्यास दुजोरा दिला नाही.
सुरेश राजीव रेगुंठा (वय 27, रा. शास्त्री नगर, येरवडा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश रेगुंठा हा येरवडा येथील शास्त्र नगरचा आहे. 25 जानेवारी रोजी तो बेपत्ता झाला असल्याची नोंद येरवडा पोलिसांकडे आहे. तो घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस पथकांकडून याबाबत माहिती काढण्याचे काम सुरु होते. दरम्यान, मांजरी रेल्वे गफाटकाजवळ संध्याकाळी एक मृतदेह पोलिसांच्या हाती लागला.
ही माहिती मिळाल्यावर स्थानिक हडपसर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याबाबत प्राथमिक तपासाअंती हा मृतदेह येरवड्यातून बेपत्ता झालेल्या सुरेश रेगुंठा याचा असल्याची माहिती निष्पन्न झाली. मृताची पार्श्वभूमी, व संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे.