Pune | बेकायदेशीरपणे कोविड सेंटर चालविणाऱ्या डॉक्टरचा अटकूपर्व जामीन फेटाळला

पुणे, दि. १७ – राज्य सरकारच्या आवश्यक त्या परवानग्या न घेता कोविड केअर सेंटर सुरू केल्याप्रकरणी एका डॉक्टरचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. आर. जगदाळे यांनी हा आदेश दिला.

निखिल विजय इंगळे (रा. शिक्रापूर) असे या डॉक्टरचे नाव आहे. या प्रकरणी तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी प्रज्ञा घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंगळे सह चौंघावर गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींनी शिक्रापूर येथे आधार नावाने कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. पण मुळात रुग्णालय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे योग्य ती प्रमाणपत्रे नाहीत. असे असताना तेथे करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू होते, अशी फिर्याद देण्यात आली आहे. इंगळे याच्या जामीन अर्जास सरकारी वकील निवेदिता काळे यांनी विरोध केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.