पुणे – तापमान पुन्हा चाळिशीपार

पुणेकरांना चटका : सायंकाळीही असह्य उकाडा

पुणे – शहरातील कमाल तापमानात झपाट्याने वाढ होत असून, मागील 24 तासांत तब्बल 4 अंश सेल्सिअसने कमाल तापमान वाढले आहे. त्यामुळे सोमवारी (दि. 6) चाळिशीपर्यंत तापमानाने मजल मारली असून, 40.2 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे.

एप्रिलमध्ये कडक उन्हाचा अनुभव घेतल्यानंतर मे महिन्यात शहरातील कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. 43 अंशापर्यंत पोहचलेले तापमानत तब्बल 35 अंशापर्यंत खाली आले. त्यामुळे दुपारचा उन्हाचा चटकाही कमी झाला होता. रात्रीच्यावेळी हवेत गारवा असल्यामुळे गरमाईपासून नागरिकांना दिलासा मिळाला. परंतू, दोन दिवसांपासून पुन्हा तापमान वाढले असून, एकाच दिवसात 3 ते 4 अंश सेल्सिअसने कमाल तापमान वाढले. त्यामुळे सोमवारी दुपारी उन्हाचा चटका जाणवत होता. दरम्यान, पुढील दोन दिवसांत शहरातील तापमान 39 ते 40 अंशाच्या आसपास राहिल. दुपारच्या वेळी आकाश ढगाळ राहण्याची शक्‍यता असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.