पुणे – शिक्षकभरतीचे अधिकार खासगी संस्थांना

मुलाखतीत बदल : मोठे आर्थिक व्यवहार होण्याची शक्‍यता

पुणे – प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता येण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने गुरुवारी मुलाखतीस नवीन निर्णय घेण्यात आला. यात मुलाखतीसाठी 30 गुण तसेच एका जागेस 10 उमेदवार असतील, असा बदल करण्यात आला. शिक्षक भरती प्रक्रियेत कुणासही हस्तक्षेप करण्यास वाव नसेल, असेही राज्य शासनाने स्पष्ट केले. मात्र, या प्रकारे शिक्षकांची भरती करताना सर्व अधिकार खासगी संस्थांनाच राहणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पारदर्शक होईल, मात्र शेवटच्या क्षणी शिक्षक निवड करताना खासगी संस्थांकडून पूर्वीप्रमाणेच मोठे आर्थिक “व्यवहार’ होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे या प्रक्रियेवर उमेदवारांकडून तीव्र संताप व्यक्‍त होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशत अनुदानित व विना अनुदानित, अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, रात्र शाळा, शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील शिक्षकांची रिक्‍त पदे आहेत. या रिक्‍त पदावर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षक सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकाची भरती अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात येईल. मात्र, खासगी शैक्षणिक संस्था अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील उच्चतम गुण प्राप्त उमेदवारांपैकी अंतिम निवड मुलाखतीच्या आधारे करण्यात येणार आहे. शिक्षक भरतीसाठीचा सुधारित शासन निर्णय जाहीर करण्यात आला. त्यावरून शिक्षक भरतीस पात्र उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे.

दरम्यान, स्वयंअर्थसहाय्यीत शाळा, अल्पसंख्याक संस्था संचलित शाळा व इंग्रजी माध्यमाच्या कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षण सेवक भरती आणि अनुकंपा तत्त्वावर नियुक्‍त करण्यात आलेल्या शिक्षण सेवक भरती आणि अनुकंपा तत्त्वावर नियुक्‍त करण्यात आलेल्या शिक्षण सेवक भरतीस पवित्र प्रणालीमार्फत नियुक्‍ती प्रक्रिया लागू होणार नसल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले.

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच संस्थाचालकांच्या मर्जीप्रमाणे शिक्षक भरती व्हावी अशाच पद्धतीची नियमावली तयार करण्यात आली आहे. यामध्ये उमेदवारांचे कोणतेही हित न पाहता केवळ संस्थाचालकांचे खिसे कसे भरले जातील याकडेच लक्ष देण्यात आले आहे. त्यामुळे पवित्र प्रणाली केवळ नावालाच “पवित्र’ राहणार असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.

शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एका जागेसाठी 5 उमेदवार मुलाखती दिले जाणार असून, मुलाखतींचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, खासगी संस्थांसाठी प्रत्यक्षात एका जागेसाठी 10 उमेदवार घेण्यात येणार आहेत. तसेच राज्य शासनास किंवा खासगी व्यक्‍तिस यामध्ये हस्तक्षेप करण्यास वाव असणार. त्यामुळे उमेदवारांची मोठी फसवणूक होण्याची शक्‍यता आहे.
– संतोष मगर, संस्थापक अध्यक्ष, डि.एड्‌. बी.एड्‌. स्टूडंट असोसिएशन

पवित्र प्रणालीद्वारे करायच्या शिक्षण सेवक तसेच शिक्षक भरतीसाठी प्राथमिक शाळांसाठी प्राथमिकचे शिक्षण संचालक तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी माध्यमिकचे संचालक हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. शिक्षक भरतीसंदर्भात येणाऱ्या सर्व अडचणींचे निराकरण संबंधित नोडल अधिकारी आवश्‍यकतेनुसार शासनाच्या सहमतीने करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)