पुणे – ‘आरटीई’ प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई करा

मनसेने केली प्राथमिकच्या शिक्षण संचालकांकडे मागणी

पुणे – “आरटीई’चे प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई करावी व पालकांना ऑनलाइन प्रवेश अर्जात दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहाराध्यक्ष कल्पेश यादव यांनी प्राथमिकच्या शिक्षण संचालकांकडे केली आहे.

प्रवेश अर्ज करताना पालकांकडून अंतर, बोर्ड, माध्यम याबाबत चुका झाल्या आहेत. काही पालकांकडून पॅनकार्ड मागून त्यांचे उत्पन्न जास्त असल्याने प्रवेश नाकारले जात आहेत. पडताळणी समितीचे सर्वच्या सर्व अधिकारी उपस्थित राहत नसल्याने पालकांना अनेकदा हेलपाटे मारू लागले आहेत. पालकांना अर्जातील चुकांची माहिती न देता प्रवेश देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. याबाबतच्या पालकांना तक्रारी दाखल करता याव्यात यासाठी मनविसेतर्फे व्हॉट्‌सऍप हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. यावर दाखल झालेल्या तक्रारी एकत्रित स्वरुपात अधिकाऱ्यांपर्यंत पोहचविण्यात आलेल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडेही या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या तक्रारींवर योग्य ती कारवाई करावी, असा अहवाल या शिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षण संचालकांकडेसादर करण्यात आला आहे. पोर्टलवरील गुगल लोकेशन दुरुस्त होणे आवश्‍यक आहे. यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही अहवालात सूचित करण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×