पुणे : स्वारगेट पोलिसांनी घेतला गहाळ 18 मोबाईल्सचा शोध

तांत्रिक तपास करुन सन 2019 ते 2020 दरम्यान तक्रारींचा निपटारा
पुणे –
स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एसटी डेपो तसेच पीएमपीएलचे थांबे आहेत. यामुळे येथे नेहमीच मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. बस पकडण्याच्या नादात जसे पाकिटमार प्रवाशांच्या खिशांवर हात साफ करतात तसेच प्रवाशांकडूनही अनेकदा स्वत:च्या वस्तू गहाळ होताना दिसतात. याच प्रकारे सन 2019 ते जानेवारी 2020 दरम्यान गहाळ झालेले 18 मोबाईल स्वारगेट पोलिसांनी हस्तगत केले आहे. हे मोबाईल नागरिकांना परत देण्यात आले आहेत. गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मोबाईल फोनची सन 2019 व 2020 वर्षापासून नागरिकांनी ऑनलाइन तक्रार दिलेल्या होत्या. गहाळ झालेल्या मोबाईलचे स्वारगेट पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय तपास पथकातील स्टाफसह तपास करत असताना पोलीस अंमलदार सचिन दळवी यांनी मोबाईल फोन तांत्रिक निरीक्षणाखाली ठेवले होते. त्यातील एकूण 18 मोबाईल फोनचा शोध घेण्यात ते यशस्वी झाले.

हे मोबाईल पुणे शहर व लगतचा परिसर तसेच कोल्हापूर आदी ठिकाणाहून हस्तगत करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक(गुन्हे) सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सचिन कदम, मंगेश बोराडे, विजय कुंभार, विजय खोमणे, सोमनाथ कांबळे, सचिन दळवी, संदीप साळवे,ज्ञाना बडे, मनोज भोकरे, वैभव शितकाल, लखन ढावरे, शंकर गायकवाड, ऋषि तिटमे यांच्या पथकाने कामगीरी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.