पुणे – भारतीय जनता पार्टी स्वच्छ भारत अभियान, महाराष्ट्र राज्य समितीचा मेळावा नुकताच पुण्यात पार पडला. यावेळी “बेटी बचाव-बेटी पढाओ’ योजनेचे राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फडके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी स्वच्छ भारत अभियान भाजपा राष्ट्रीय संयोजक यशवंतसिंग दरबार, राजेश झा यांच्यासह सॅल्युट तिरंगा, डिम्पी बजाज तसेच भाजपा पुणे शहर पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये विविध पदांचे वाटप आणि योजनांचा शुभारंभ झाला.
तसेच गुणवंत विद्यार्थीनीचा गौरव आणि स्वच्छता सैनिकांचा सन्मान करण्यात आला. तसेच सॅल्युट तिरंगा अंतर्गत देशसेवा सैनिक परिवारांचा गौरव यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.