पुणे – अकरावी प्रवेशासाठी “सीईटी’ घेण्याबाबत सर्वेक्षण

शालेय शिक्षण विभागाकडून चाचपणी सुरू; विद्यार्थ्यांना ऑनलाइन मत व्यक्‍त करता येणार

पुणे – करोना प्रादुर्भावामुळे इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. इयत्ता अकरावी प्रवेशासाठी 100 गुणांची ऑफलाइन सीईटी घेण्याची चाचपणी शालेय शिक्षण विभागाने सुरू केलेली आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडून मते मागवण्यात आलेली आहेत.

इयत्ता अकरावीच्या वर्गात प्रवेशासाठी गुण देण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत एक स्वतंत्र सीईटी परीक्षा घ्यावी काय? असे प्रस्तावित आहे. सीईटी परीक्षा राज्यातील सर्व इच्छुक इयत्ता दहावीचे विद्यार्थी देऊ शकतील. सीईटी परीक्षेचे स्वरूप हे साधारणत: ओएमआर पद्धतीनुसार असावी, सर्व विषयांचा मिळून एकत्रित एक पेपर असावा. यासाठी सुमारे
2 तासांचा वेळ देण्यात येईल. परीक्षा साधारणत: जुलै किंवा करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्रत्येक शाळेच्या ठिकाणी घेण्यात यावी, असे विचाराधीन आहे. या परीक्षेच्या गुणांच्या आधारावर इच्छुक विद्यार्थ्यांना गुणात्मक तत्वावर अकरावीमध्ये प्रवेश देता येईल.
अंतर्गत मूल्यमापनाबाबतही राज्यभर सर्वेक्षण महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासाठी अंतर्गत मूल्यमापन करण्यात येणार आहे. याबाबत ही सर्वेक्षण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची अंतर्गत मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केली आहे काय ? यासाठी शाळा तयार आहेत काय ? हे जाणून घेण्यासाठी हे
सर्वेक्षण करण्यात येत आहे.
यासाठी राज्यातील राज्य मंडळाशी संलग्न असणाऱ्या सर्व इयत्ता दहावीचे वर्ग असणाऱ्या शासकीय, शासकीय अनुदानित, विनाअनुदानित, खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी हिीीं://ुुु.ीशीशरीलह.पशीं/ी/10खछढअडडएडडचएछढ लिंकवर माहिती भरण्याबाबत माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
माहिती भरण्याची लिंक रविवारी (दि.9) बंद होणार आहे, असे शिक्षण विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

आज दिवसभर मुदत
सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी यासाठी राबविण्यात येणाऱ्या हिीीं://ुुु.ीशीशरीलह.पशीं/ी/11ींहउएढढएडढ या
सर्वेक्षण लिंकमध्ये आपले स्पष्ट मत नोंदणी करावी. लिंक ही 9 मे रोजी बंद होईल, असेही शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

=============

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.