पुणे – 623 रुग्णालयांना 6 हजार रेमडेसिविरचा पुरवठा

पुणे – जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दररोज कोविड रुग्णालयांकडून येणाऱ्या मागणीच्या तुलनेत रेमडेसिविर इंजेक्‍शनची वाटप केले जात आहे. त्यामुळे रुग्णांना तत्काळ आणि कोणतीही धावपळ न करता इंजेक्‍शन उपलब्ध होत आहे. दरम्यान, आजही दिवसभरात 623 कोविड रुग्णालयाना 6 हजार 166 इंजेक्‍शनचा पुरवठा केला आहे. तर मागील दोन दिवसांत जवळपास दहा हजार इंजेक्‍शनचे वाटप केले आहे.

जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना ऑक्‍सिजन बेडच्या संख्येनुसार रेमडेसिविर इंजेक्‍शन्सच्या व्हाईल देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, कॅन्टोन्मेंट क्षेत्र व ग्रामीण क्षेत्रातील हॉस्पिटल्सलाचा समावेश आहे.

संबंधित कोविड रुग्णालयांनी सदरचा औषध साठा प्राप्त करून घेणेकामी रुग्णालयाच्या लेटर हेडवर सही शिक्‍क्‍यासह प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्‍तीचे फोटो ओळखपत्र घाऊक विक्रेत्याकडे सादर करणे आवश्‍यक आहे. याबाबतची खातरजमा करून घाऊक विक्रेत्यांनी औषधाचे सुयोग्य वितरण सदर आदेशाचे दिनांकास मुदतीत व शासकीय, वाजवी दरात करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना थेट साठा उपलब्ध होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.