पुणे – मध्य रेल्वेने 5 आणि 6 क्रमांकाच्या रेल्वे लाईनच्या कामासाठी ठाणे-दिवा मार्गावर 18 तासांचा ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे 20 डिसेंबरपर्यंतच्या काही रेल्वेच्या मार्गांत बदल होणार आहे. तर, काही रेल्वे रद्द केल्या आहेत. 19 डिसेंबर रोजी सुटणारी डेक्कन एक्स्प्रेस आणि डेक्कन क्वीन रद्द करण्यात येणार आहे.
तांत्रिक कामांमुळे रेल्वे मार्गांवर ब्लॉक घेण्यात येतात. परिणामी अनेक रेल्वे मार्गांत बदल करण्यात येणार आहे. तर, पुण्यामार्गे धावणाऱ्या काही रेल्वे रद्द होणार आहेत. 18 डिसेंबर रोजी सुटणारी अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहे. 19 डिसेंबर रोजी सुटणारी मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्स्प्रेस, मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, मुंबई-अमरावती एक्स्प्रेस, मुंबई-गडग एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड एक्स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस रद्द केली. 20 डिसेंबर रोजी सुटणारी आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस आणि गडग-मुंबई एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहे.
या रेल्वेमार्गात अंशत: बदल
18 डिसेंबर रोजी धावणारी हुबळी-दादर एक्स्प्रेस पुणे स्थानकापर्यंत आणि 19 डिसेंबर रोजी धावणारी दादर-हुबळी एक्स्प्रेस पुण्याहून सुटणार आहे.