पुणे – उन्हाचा स्वाईन फ्लूला “चटका’

रुग्ण संख्या घटली : 6 हजार 600 व्यक्तींची तपासणी

पुणे – शहरात मागील पंधरा दिवसांपासून उन्हाचा चटका वाढत असल्यामुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताना दिसत आहे. मंगळवारी (दि.9) दिवसभरात 6 हजार 600 व्यक्तींची स्वाईन फ्लू तपासणी करण्यात आली. त्यामध्ये स्वाईन फ्लूचा एकही रूग्ण आढळून आला नाही. तसेच, अतिदक्षता विभागातील रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. दहा दिवसांपूर्वी अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या 13 रुग्णांपैकी 8 जणांना घरी सोडण्यात आले असून, केवळ 5 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

मार्च महिन्यात उन्हाचा कडाका वाढूनही स्वाईन फ्लू कमी होण्याचे नाव घेत नव्हता. परंतु, सलग पंधरा दिवसांपासून उन्हाचा पारा 40 अंशांच्या पुढे असल्यामुळे प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसून येते. मागील आठ दिवसांत केवळ 4 रुग्ण आढळून आले असून, मंगळवारी दिवसभरात एकही रुग्ण सापडला नाही. तर 48 संशयित व्यक्तींना टॅमीफ्लू देऊन घरी सोडण्यात आले. प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, आरोग्य विभागाने गाफील न राहाता तो आटोक्‍यात ठेवण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करून ठेवणे आवश्‍यक आहे. तर नागरिकांनी घराबाहेर पडताना नाका-तोंडाला रुमाल बांधूनच बाहेर पडावे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.