पुणे – पुणे लोहमार्ग पोलिसांनी भविष्यात निर्माण होणारी करोना संदर्भातील परिस्थिती लक्षात घेता फेब्रुवारी 2021 मध्ये वैद्यकीय साहित्य खरेदी करुन ठेवले होते. मात्र सध्या राज्यातील करोनासंदर्भाती परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी संबंधीत वैद्यकीय साहित्याचा वाटप जिल्हा आरोग्य सेवेकरता केला आहे. यासाठी संबंधीत जिल्हयांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
यासंदर्भात माहिती देताना पोलीस अधीक्षक (लोहमार्ग) सदानंद वायसे पाटील यांनी सांगितले, सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच पोलिसांनाही करोनाचा संसर्स मोठ्या प्रमाणात होत आहे. यासाठी प्रतिबंधात्मक व उपचाराऱ्या उपाययोजना मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या आहेत. पोलिसांना आरोग्य सुविधांबरोबरच प्रतिबंधात्मक साधनेही उपलब्ध करुन दिली आहे.
दरम्यान भविष्याची तरतून म्हणून फेब्रुवारी महिण्यात काही वैद्यकीय साहित्य खरेदी करण्याच आले होते. दौंड, ठाणे, सोलापूर, कुर्डवाही, अहमदनगर, मिरज येथील उपअधिक्षक कार्याल व लोमार्ग मुख्यालय खडकी यांना वाटप करण्यात आले होते. मात्र राज्यातील करोना महामारीची परिस्थिती लक्षात घेता, हि सर्व उपकरणे त्या त्या जिल्हयाच्या आरोग्य सेवेकरीता उपलब्ध करुन दिल्यास करोना बाधित रुग्णांना त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळू शकेल. यामुळे तातडीने निर्णय घेत ही वैद्यकीय साधणे संबंधीत जिल्हयातील आरोग्य केद्रांना उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.