पुणे – दि.23 जूनपर्यंत निवडणूक खर्च सादर करा

पुणे – जिल्ह्यातील पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती या चार लोकसभा मतदारसंघांतून निवडणुकीतील उमेदवारांनी येत्या दि.23 जूनपर्यंत निवडणूक खर्च सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीतील उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींची एक बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीस जिल्हा प्रशासनातील अधिकारी तसेच निवडणूक खर्च निरीक्षक उपस्थित होते. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर उमेदवारांनी त्यांच्या निवडणुकीचा खर्च महिन्याच्या आत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्‍यक असते. उमेदवारांनी विहित मुदतीमध्ये तसेच आवश्‍यक त्या नमुन्यात निवडणूक खर्च सादर करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्ह्यात यंदा दोन टप्प्यांत निवडणुका पार पडल्या. एप्रिलमध्ये निवडणुका झाल्या. तर दि.23 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यानुसार दि. 23 जूनपर्यंत उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च सादर करणे बंधनकारक असल्याने जिल्हा प्रशासनाकडून या नियमाची माहिती उमेदवारांना देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)