पुणे – तपशील सादर करा, अन्यथा मानधन नाही

अर्ज स्वीकृती केंद्रांना राज्य सीईटी सेलचा इशारा

पुणे – येत्या शैक्षणिक वर्षासाठी तंत्रशिक्षण संचालनालय अंतर्गत येणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विविध अर्ज स्वीकृती केंद्र (एफसी) आणि प्रवेश निश्‍चिती केंद्र (एआरसी) नेमण्यात आलेले होते. मात्र या केंद्रांनी अद्यापपर्यंत बॅंक तपशील ऑनलाइन पद्धतीने सादर केले नाहीत. ही माहिती दि. 30 एप्रिलपर्यंत सादर करा, अन्यथा मानधन मिळणार नसल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

एफसी आणि एआरसी केंद्रांना मानधन ऑनलाइन पद्धतीने संबंधित संस्थेच्या बॅंक खात्यात जमा करावयाचे आहे. परंतु सर्व संबंधित केंद्राचे बॅंक तपशील राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे उपलब्ध नाहीत. त्यासाठी केंद्रांना दि. 16 एप्रिलपर्यंत दिलेल्या लिंकवर जाऊन केंद्राबाबत माहिती, बॅंक खाते तपशील आणि अभ्यासक्रमनिहाय विद्यार्थी निश्‍चित केलेली संख्या अचूक भरावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र अद्यापही काही संस्थांनी ही माहिती सादर केली नाही.

त्या पार्श्‍वभूमीवर संस्थांना सर्व माहिती ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी आता दि. 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत ज्या संस्था माहिती सादर करतील, त्याच संस्थांना मानधन देण्यात येणार असल्याचे राज्य सामाईक प्रवेश कक्षाने स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.