पुणे – बोगस सनदी लेखापाल प्रमाणपत्रांना बसणार आळा

पुणे  – सनदी लेखापालांकडून दिली जाणारी प्रमाणपत्रे अधिकृत आहेत, याची खात्री करण्यासाठी या प्रमाणपत्रांवर ‘युनिक डॉक्‍युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर’ (युडीआयएन) सक्तीचा केला जाणार आहे. त्यामुळे येत्या आर्थिक गैरप्रकार रोखण्यासाठी, तसेच सीएचे बनावट प्रमाणपत्र तयार करण्याला आळा बसेल, अशी माहिती द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) केंद्रीय समितीचे सदस्य सीए एस. बी झावरे यांनी दिली.

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडियाच्याच्या (आयसीएआय) पुणे शाखेच्या प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटीच्या वतीने “युडीआयएन-प्रमाणपत्र सुरक्षेचा मार्ग’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यानंतर झावरे पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी दिल्ली येथील प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष रणजितकुमार अगरवाल, चंद्रशेखर चितळे, पुणे शाखेच्या उपाध्यक्षा ऋता चितळे, खजिनदार अभिषेक धामणे, शशिकांत बर्वे उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

झावरे म्हणाले, “गेल्या काही वर्षात सनदी लेखापालांची बनावट प्रमाणपत्रे तयार केल्याचे आढळले आहे. हे रोखण्यासाठी “युडीआयएन’ प्रणाली विकसित केली आहे. प्रमाणपत्र देताना संकेतस्थळावर जाऊन माहिती भरल्यानंतर हा क्रमांक मिळेल. तो क्रमांक प्रत्येक प्रमाणपत्रावर टाकणे अत्यावश्‍यक आहे. हा क्रमांक नसल्यास सदरचे प्रमाणपत्र अधिकृत धरले जाणार नाही. तसेच संबंधित सीएवर कारवाईही होऊ शकते. सीएने दिलेले प्रमाणपत्र अधिकृत आहे की नाही, ग्राहक अथवा संबंधित पक्ष तपासू शकतो. युडीआयएन क्रमांक टाकून पडताळणी करता येईल.

चंद्रशेखर चितळे म्हणाले, “सीएच्या नावाने बनावट प्रमाणपत्र तयार करण्याचे प्रकार रोखण्यासाठी “युडीआयएन’ हे क्रांतिकारी पाऊल आहे. प्रमाणपत्रांची सत्यता बॅंक, प्राप्तिकर विभाग, सेबी व तत्सम नियंत्रण संस्था पडताळू शकणार आहेत. अभिषेक धामणे यांनी या कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. अमृता कुलकर्णी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)