पुणे- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात सगळीकडे संचारबंदी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे स्टेशन आणि स्टेशन जवळील परिसरात शुकशुकाट बघायला मिळतो आहे.
पुणे स्टेशन संपुर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर शहरातील अनेक ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. महाराष्ट्रात पुण्यात कोरोनाच्या रग्णांची संख्या जास्त असल्यामुळे शहरात जास्त प्रमाणात खबरदारी घेतली जात आहे.
दरम्यान, पुण्यासोबतच मुंबईतही कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याची शक्यता आहे.