Pune : बालगंधर्व व अन्य नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरू करा – आबा बागुल

पुणे – पुण्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आली आहे. बालगंधर्व रंगमंदिर व अन्य नाट्यगृह किमान 25 किंवा 50 टक्के क्षमतेने का होईना सुरू करावे, अशी मागणी आबा बागुल यांनी केली आहे.

कलावंत हे टाळ्यांचा भुकेले असतात. नाट्यगृह बंद असल्याने हजारो कालावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे सर्व संसार यावरच चालतात. त्यांना सावरण्यासाठी तसेच आज पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीत हजारो सांस्कृतिक कार्यक्रमांना गर्दी करणारे पुणेकर हे गेल्या दीड वर्षे कार्यक्रमांपासून वंचित आहेत. त्यांची सांस्कृतिक भूक भागत नाही. हा सर्वच बाबतीत परिणाम झाला आहे. हे लक्षात घेऊन 26 जून रोजी बालगंधर्व रंगमंचाचा वर्धापनदिन आहे. त्या दिवसापासून तरी किमान 25 किंवा 50 टक्के क्षमतेने बालगंधर्व रंगमंदिर व अन्य नाट्यगृह सुरू व्हावे अशी विनंती राज्य शासन व पुणे महानगरपालिकेकडे आबा बागुल यांनी केली आहे.

या संदर्भात पालकमंत्री अजित पवार यांनी नाट्यगृह व मॉल्स अजून सुरू होऊ शकत नाही त्याचा निर्वाळा दिलाय. मात्र अजून 10 दिवसात कोरोनाचा प्रभाव आणखी कमी होत गेला. तर बालगंधर्व रंगमंदिर व अन्य नाट्यगृह सुरू तरी करावेत. यातून नागरिकांची सांस्कृतिक भूक भागवावी व हजारो कलावंतांच्या उपजीविकेविषयी शासनाने योग्य विचार करावा, अशी  मागणी आबा बागुल यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.