पुणे – एसटी गाड्यांचे पार्किंग साखर संकुल परिसरात

पुणे – शिवाजीनगर मेट्रोच्या कामामुळे शिवाजीनगर डेपोतील एसटीच्या गाड्यांचे पार्किंग साखर संकुलच्या परिसरामध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.

शिवाजीनगर सारख्या शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये मेट्रोच्या कामाने वेग घेतला आहे. यामुळे या परिसरामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना नियमितपणे वाहनचालकांना करावा लागतो. मेट्रोच्या कामाचा परिणाम वाहतुकीसह एसटीबसेसवर देखील झाला आहे. परिणामी एसटी गाड्यांच्या पार्किंग व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवाजीनगर स्थानकाची काही जागा मेट्रोला दिल्याने डेपोतील पार्किंग अपुरे पडत आहे. त्यामुळे डेपोमध्ये उभ्या करण्यात येत असणाऱ्या गाड्यांसाठी मेट्रोकडून साखर संकुलाची जागा देण्यात आली आहे. या जागेमध्ये साधारण 25 बसेसच्या पार्किंगची व्यवस्था होणार असल्याचे पुणे विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.