लग्न समारंभावरील निर्बंधांमुळं ‘इव्हेंट’ क्षेत्राची उपासमार

पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर, केटरींग व लॉन्स असोसिएशनचा आगामी सरकारी निमसरकारी कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचा इशारा

पुणे : गेल्या वर्षापासून पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर, केटरींग व लॉन्स असोसिएशन आणि असोसिएशनवर अवलंबून इंडस्ट्री उद्याच्या आशेवर तग धरुन आहे. आगामी काळात सरकारने पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर, केटरींग व लॉन्स असोसिएशन आणि असोसिएशनवर अवलंबून इंडस्ट्री सभासदांना कोविड-19 नियमांच्या सरसकट चौकटीत न बसवता धोरणात लवचिकता आणावी. अन्यथा अंतिम उपाय म्हणून आगामी सरकारी निमसरकारी कार्यक्रमांवर असोसिएशनतर्फे बहिष्कार घालण्याचा इशारा पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर, केटरींग व लॉन्स असोसिएशनतर्फे आज देण्यात आला.

या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी असोसिएशनतर्फे सनदशीर मार्गाने आणि कोवड-19 संबंधी सध्या लागू असलेल्या सर्व नियमांचे पालन करुन सामाजिक अंतर राखत मानवी साखळी करुन आंदोलन करण्यात आले.

कोविड 19 च्या महामारीमुळे जवळपास 12 महिने कोणतेही मोठे कार्यक्रम झाले नाहीत. लॉकडाऊन संपल्यानंतर ‘अनलॉक’मध्ये इतर व्यवसायांना टप्प्याटप्प्याने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोविड 19 च्या दुस-या लाटेचे संकेत मिळत असल्याने शासनाने पूर्व परवानगी दिलेल्या आस्थापनांना देखील काही नियम व अटी घालून बंधने घातली आहेत. चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे यांना 50 टक्के उपस्थितीस, तर लग्न समारंभात 50 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी दिली आहे. परंतू लॉन्स किंवा बँक्वेट हॉल यांची रचना मूलतः एक हजार किंवा त्याहून व्यक्तींच्या दृष्टीने केलेली असते. अशा पार्श्वभूमीवर लग्न समारंभांना केवळ 50 पन्नास व्यक्तींची परवानगी दिल्याने लॉन्स किंवा बँक्वेट हॉलचे संपूर्ण आर्थिक नियोजन ढासळत आहे.

जाहीर कार्यक्रम, लग्न समारंभ, इव्हेंट्स, सांस्कृतिक सभागृहे, थिएटर, लॉन्स, केटरिंग यासंबंधित क्षेत्रात काम करणारे साउंड, लाईट, एलईडी वॉल, जनरेटर्स, फ्लोरिस्ट, डेकोरेटर्स, मंडप, व्हिडीओग्राफर्स, फोटोग्राफेर्स, बँड, इव्हेन्ट कोऑर्डिनेटर असे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. लाखो रुपयांची इक्विपमेंट्स धूळ खात पडून आहेत. तर या व्यवसायावर उपजीविका अवलंबून असलेल्या महाराष्ट्रातील जवळपास दीड ते दोन कोटी लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

 

 

 

 

 

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.