पुणे – वैचारिक मतभेदामुळे वेगळे राहणाऱ्या दाम्पत्याचा घटस्फोट २० दिवसात मंजूर झाला आहे. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश के.ए. बागे-पाटील यांनी हा निकाल दिला आहे. दोघांचा प्रेमविवाह होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय-निवाड्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे १८ महिने वेगळे राहत असल्यास सहा महिन्याचा कालावधी वगळता येतो. या प्रकरणात दावा दाखल करतेवेळी दोघे नोव्हेंबर २०२२ पासून वेगळे राहत आहेत. त्यामुळे हा कालावधी वगळण्याची मागणी अर्जदार वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला आहे. माधव (वय ४२) आणि माधवी (वय ४७)(नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत.
दोघांतर्फे अॅड. कुमार माळवदकर, अॅड.. नंदकिशोर येरंडे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड.. विवेक माळवदकर, अॅड.. मुकुल महिंद्रकर यांनी सहकार्य केले. तो आणि ती दोघेही नोकरी करायचे. ती त्याच्यापेक्षा मोठी आहे. तिचे दुसरे लग्न आहे. तिला पहिल्या पतीपासून मुलगी आहे. २४ आॅक्टोबर २००८ रोजी त्यांचा प्रेमविवाह झाला.
काही दिवस सुरळीत संसार केला. त्यानंतर दोघात वाद होऊ लागले. वाद विकोपाला गेल्यानंतर दोघे वेगळे राहू लागले. २७ सप्टेंबर २०२२ पासून वेगळे राहत आहेत. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दावा दाखल केला. काही दिवस सुरळीत संसार सुरू होता.निकालानुसार मुलगी पत्नीकडे असणार आहे.
“वैचारिक मतभेदामुळे नोव्हेंबर २०२२ वेगळे राहत होते. दोघे आता एकत्र येणे शक्य नव्हते. परस्पर संमतीने दोघेही घटस्फोट घेण्यास तयार असल्याने दोघांना आणखी सहा महिने थांबविणे योग्य नव्हते. या निर्णयामुळे वेळेची बचत झाली आहे. दोघेही स्वतंत्र्यपणे आयुष्य जगण्यास मोकळे झाले आहेत.” – ॲड. कुमार माळवदकर, ॲड. नंदकिशोर येरंडे, अर्जदारांचे वकील.