पुणे – रेल्वेच्या सोलापूर विभागातर्फे दौंड-कुर्डुवाडी या रेल्वेमार्गावर ट्रॅक डबलिंगसाठी केल्या जाणाऱ्या तांत्रिक कामामुळे पुण्याहून सोलापूरला जाणारी पुणे-सोलापूर-पुणे विशेष गाडी क्रमांक 01157/01158 ही 2 ते 16 सप्टेंबरदरम्यान रद्द करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.