पुणे विभागात सर्वाधिक निकाल; विभागात 5 विद्यार्थी 100 नंबरी
पुणे – सोलापूर, नगर आणि पुणे जिल्ह्याचा समावेश असलेल्या पुणे विभागीय मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल 96.96 टक्के इतका लागला आहे. यात पुणे जिल्हा-96.77%, नगर जिल्ह्याचा 96.58 टक्के आणि सोलापूर जिल्ह्याचा 97.74 टक्के इतका निकाल लागला आहे.
विभागाच्या निकालात सोलापूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. पुणे विभागात 5 विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळविले आहेत. त्यात पुण्यातील तीन, नगर आणि सोलापूर जिल्ह्याचा प्रत्येक एक विद्यार्थ्याचा समावेश आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी पुणे विभागातून 2 लाख 66 हजार 400 विद्यार्थी परीक्षेला होते. त्यापैकी 2 लाख 58 हजार 312 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा अडीच टक्क्यांनी जास्त आहे.
या परीक्षेला पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी म्हणून 9 हजार 110 इतके बसले होते. त्यापैकी 7 हजार 305 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 80.18 आहे.
तालुकानिहाय निकाल (टक्के) :
1) आंबेगाव : 98.28, 2) बारामती : 97.71, 3) भोर : 99.44, 4) दौंड : 96.78, 5) हवेली : 95.12, 6) इंदापूर : 97.49, 7) जुन्नर : 97.54, 8) खेड : 96.33, 9) मावळ : 97.64, 10) मुळशी : 96.22,
11) पुणे शहर-पूर्व : 96.24, 12) पुरंदर : 99.05, 13) शिरूर : 96.75, 14) वेल्हा : 97.29, 15) पुणे शहर-पश्चिम : 96.12, 16)
पिंपरी-चिंचवड : 97.73.
जिल्हानिहाय निकाल : पुणे – 96.77, नगर – 96.58, सोलापूर – 97.74