पुणे – वारजे येथे पूर्ववैमनस्यातून गोळीबार केल्याप्रकरणात मोक्क न्यायालयाने एकाला दिलासा दिला आहे. एफआयआरमध्ये नाव नाही. इतर कोणताही गुन्हा दाखल नाही. प्रत्यक्षदर्शी नाही. तो घटनेच्या ठिकाणी असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा बचाव पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने मोक्काचे विशेष न्यायाधीश एस.आर.नावंदर यांनी जामीन मंजुर केला आहे.
मोन्या ऊर्फ रामेश्वर मोरे असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. अभिषेक हरगणे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. हरगणे यांना ऍड. योहान मेहता, ऍड. अजिंक्य पोळ यांनी सहकार्य केले. पूर्ववैमनस्यातून 8 ऑगस्ट 2021 रोजी गोळीबार केल्याची घटना एनडीए रस्त्यावर घडली. या प्रकरणी मोरेसह नऊ जणांवर उत्तमनगर पोलिसात खूनाचा प्रयत्नसह विविध कलमांनी गुन्हा दाखल आहे.