Kerala hotel crime – रविवारी सकाळी येथील एका हॉटेलच्या खोलीत महाराष्ट्रातील दाेघे मृतावस्थेत आढळले. मृतांत एक महिला आहे. मृत भाऊ-बहीण असून मूळचे पुण्याचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यापैकी पुरुषाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला होता, तर महिला बेडवर मृतावस्थेत आढळली. या दोघांनी गेल्या शुक्रवारी हॉटेलमध्ये चेक इन केले होते असेही ते म्हणाले.
सकाळी खोली बंद असल्याचे हॉटेल कर्मचाऱ्यांना लक्षात आले. त्यांनी लगेच पोलिसांना कळवले. खोलीतून मृत्यूपूर्व लिहिलेली चिठ्ठी जप्त केली. यातून दोघांकडे घर किंवा नोकरी नसल्याचे स्पष्ट हाेते. तपासाआधारेच अधिक तपशील सांगता येईल, असे पोलिसांनी सांगितले.