पुणे : प्रतिबंधित क्षेत्रातील दुकाने १५ जूननंतर उघडणार

पुणे (प्रतिनिधी) : करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर मध्यभागातील प्रतिबंधित क्षेत्रात असलेली दुकाने गेली ८५ दिवस बंद आहेत. व्यापारी आणि कामगार वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आल्यानंतर बुधवारी (१० जून) पार पडलेल्या बैठकीत प्रतिबंधित भागातील दुकाने १५ जूननंतर उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

प्रतिबंधित भागात नाना-भवानी पेठ, टिंबर मार्केट, नेहरु रस्ता, ढोले पाटील चौक (सेव्हन लव्हज चौक), गणेश पेठ, गुरूवार पेठ, शुक्रवार पेठ, गोविंद हलवाई चौक, रास्ता पेठ, रविवार पेठेतील कापडगंज, बोहरी आळी, सोन्या मारुती चौक, मोती चौक, फडके हौद चौक परिसराचा समावेश होतो. या भागातील दुकाने गेली ८५ दिवस बंद असल्याने व्यापारी वर्गासह कामगार संकटात सापडले आहेत. दुकाने उघडण्याची परवानगी देण्याची मागणी व्यापाºयांनी केली होती. त्यानंतर मंगळवारी (९ जून) प्रशासकीय अधिकाºयांबरोबर व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींनी प्रतिबंधित भागात पाहणी दौरा केला. विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची मते जाणून घेण्यात आली.

बुधवारी महापालिकेत प्रशासकीय आधिकारी आणि व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत प्रतिबंधित क्षेत्रात बदल करण्यात येणार असून नवीन सूक्ष्म प्रतिबंधित भाग निश्चित करण्यात येणार आहे. १५ जूननंतर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात येईल, अशी माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.