#VIDEO : पुण्यातील तुळशी बाग मार्केटमधील ‘लोटस फ्लॉवर्स’ दुकानाला आग

पुणे : पुण्यातील प्रमुख बाजारपेठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या तुळशी बाग मार्केटमधील ‘लोटस फ्लॉवर्स’ या दुकानाला आज रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या दुर्घटनेबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तुळशी बाग मार्केट हा गजबजलेला परिसर असल्याने ही आग इतर दुकानांपर्यंत पोहचण्याची भीती येथील व्यापाऱ्यांना होती. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.

पुण्यातील तुळशी मार्केट परिसरामधील 'लोटस-फ्लॉवर्स' या दुकानाला आग लागली असून सदर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Posted by Dainik Prabhat on Saturday, 26 January 2019

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘लोटस फ्लॉवर्स’ हे सजावटी फुलांचे दुकान असून दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकची सजावटी फुले व इतर वस्तू असल्याने आग भडकण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला होता मात्र अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)