हडपसर – राज्यात महायुतीचे सरकार आणणे आणि राज्याचा विकास करणे, सामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवणे हेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ध्येय आहे. पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर येणार आहे. हडपसर मतदार संघातूनही महायुतीचे उमेदवार चेतन तुपे हे मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास शिवसेना शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार आमदार चेतन तुपे यांनी महंमदवाडी, कृष्णा नगर, हेवन पार्क ते श्रीराम चौक या भागांमध्ये शिवसेना शहर प्रमुख भानगिरे यांच्या समवेत पदयात्रा केली. या सर्व भागांत महिलांनी उमेदवार तुपे यांचे औक्षण केले. त्यावेळी भानगिरे बोलत होते.
माजी नगरसेवक फारुख इनामदार, अभिमन्यू भानगिरे कलेश्वर घुले, अभिजीत बोराटे, अमर घुले, पंकज कोद्रे, मनोज घुले, सुरेश घुले, सचिन तरवडे, करण भानगिरे, अंकुश घुले, गोरख घुले, आकाश भानगिरे, सचिन भानगिरे, संदीप अल्हाट, संतोष रजपूत, संतोष जाधव, सौरभ खेडेकर, खन्नासिंग कल्याणी, शितल गाडे, निकिता भंडारी, स्मिता साबळे, आशा यादव, प्रतिमा बोबडे, आशा कांबळे, अर्चना सूर्यवंशी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.
हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीत शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागला आहे. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत. मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तर आमदार चेतन तुपे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तसेच आमदार योगेश टिळेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मतदारसंघात निधी आणून विकास साधला असल्याचे प्रमोदनाना भानगिरे यांनी सांगितले.