पुणे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट) च्या पुणे शहराध्यक्षपदी शैलैंद्र चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत चव्हाण यांची निवड करण्यात आली.
उपमहापौर सुनीता वाडेकर , माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे , प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव , शहराध्यक्ष संजय सोनवणे , परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, ऍड. मंदार जोशी , महिपाल वाघमारे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
चव्हाण यांची निवड पुढील एका वर्षासाठी असणार असून महापालिका निवडणूका त्यांच्याच नेतृत्वाखाली पक्षाकडून लढविल्या जाणार आहेत.