पुणे – आतापर्यंत 598 मिळकतींवर जप्ती

11 सील : मिळकतकर थकबाकी वसुली मोहीम


1 ते 12 फेब्रुवारी दरम्यान 19 कोटींची थकबाकी वसूल


1 एप्रिल 2018 ते 12 फेब्रुवारी 2019 पर्यंत दीड कोटींचा मिळकतकर वसूल

पुणे – महापालिकेच्या कर आकारणी आणि करसंकलन विभागाकडून मिळकत वसुलीबाबत मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू केली असून या आठवड्यात 11 मिळकतींना सील करण्यात आले आहे. या मिळकतींचा समावेश करून एकूण 598 मिळकतींवर जप्तीची कारवाई केली आहे. तसेच 1 ते 12 फेब्रुवारी दरम्यान 19 कोटी 13 लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2018 ते 12 फेब्रुवारी 2019 पर्यंत 1 कोटी 31 लाख 46 हजार रुपयांची मिळकतकर वसुली करण्यात आली आहे.

ललितकुमार जैन यांची बिबवेवाडीतील के. के. एरेक्‍टोर्सची 30 लाख 79 हजार 644 रुपये थकबाकी असल्याने त्यांची मिळकत सील करण्यात आली आहे. तसेच, कोथरूड येथील दिवीनेट असो. टेक्‍नॉलॉजीज यांची 23 लाख 93 हजार 896 रुपये थकबाकी असल्याने त्यांच्या पाच मिळकतींना सील ठोकण्यात आले आहे.

ससून रस्त्यावरील सील करण्यात आलेली भारती अशोक बक्षानी यांच्या मिळकतीची थकबाकी 2 लाख 11 हजार 933 रुपये आहे, नारायण गणपत राऊत यांची मार्केटयार्ड येथील सील केलेल्या मिळकतीची थकबाकी 2 लाख 2 हजार 4 रुपये आणि घोरपडी येथील सुजाता भोसले यांची 1 लाख 92 हजार 228 रुपये थकबाकी असल्याने ती सील करण्यात आली आहे. ससून रस्त्यावरील मेघना पब्लिशिंग कंपनीच्या 2 मिळकतीही सील केल्या असून, त्यांची थकबाकी 3 लाख 43 हजार 494 रुपये आहे.

ससून रस्त्यावरील कॅप्रिकॉर्न प्लाझा प्रा. लि. यांच्याकडून 10 लाख रुपये, कात्रज येथील मनमोहनश्री इस्टेट यांच्याकडून 9 लाख 10 हजार 175 रुपये, गुलटेकडी येथील ओसवाल हसमुखलाल यांच्याकडून 6 लाख 92 हजार 322, पर्वती येथील अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद यांच्याकडून 5 लाख 57 हजार 548 रुपये, विमाननगर येथील के. आर. बजाज यांच्याकडील 4 लाख 93 हजार 871 रुपये, वानवडी येथील गोल्डी शर्मा यांच्याकडून 2 लाख 73 हजार 868 रुपये थकबाकी वसूल करण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)