पुणे – केंद्र आणि राज्य शासनाकडून उपलब्ध झालेल्या करोना प्रतिबंधक लसींच्या डोसनुसार लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार 45 वर्षांवरील नागरिकांसाठी तूर्त दुसऱ्या डोसला प्राधान्य देत आहोत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी दिली.
शहरातील लसीकरण मोहिमेत कोव्हिशील्डसाठी-97, तर कोवॅक्सिनसाठी 18 केंद्र महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून उपलब्ध केले आहेत. या सर्व ठिकाणी केवळ दुसरा डोस दिला जाणार आहे. तर, 45 वर्षांवरील नागरिकांसाठी 23 हजार डोस उपलब्ध आहेत, अशी माहिती महापौरांनी दिली आहे.