पुणे – नव्या शैक्षणिक वर्षाला 13 जून पासून सुरुवात होत आहेत. तर, करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावेच लागणार आहे.
शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व तयारी पूर्ण करणे आवश्यक आहे. शाळेची स्वच्छता करणे, शाळेचे सौंदर्यीकरणे करणे ही कामे करावी लागणार आहेत. शालेय शिक्षक वृंद व इतर कर्मचाऱ्यांना कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा व त्यानंतरची बूस्टर मात्रा घेण्यासाठी विभागाच्या स्तरावर आवश्यक कार्यवाही करणे गरजेचे आहे.
वयोगट 12 वर्षे व त्यापुढील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यावर भर द्यावा लागणार आहे. कोविड योग्य वर्तनचे शाळा व शालेय परिसरात पालन होईल याबाबत शालेय प्रशासनाने दक्षता घ्यावी.
शाळा, पालकांना सूचना
* ज्या विद्यार्थ्यांना ताप किंवा इतर
* कोविडसदृश्य लक्षणे आढळल्यास अशा पाल्यांना
* शाळेत पाठवू नये
* संबंधित पालकांना शाळा प्रशासनाने सूचना द्याव्यात
* शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांपैकी ज्यांला ताप किंवा इतर कोविडसदृष्य लक्षणे आढळल्यास त्याचे तेथेच तत्काळ विलगीकरण करावे.
* संबंधित विद्यार्थ्याची तातडीने रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट किंवा आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागणार आहे.
* शाळांमध्ये येणाऱ्या मुलांचे, पालकांचे कोविडच्या अनुषंगाने प्रबोधनही करावे लागणार आहे.