पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची(व्हीएसआय) ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक वितरण सभारंभ येत्या गुरुवारी (२३ जानेवारी) होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर येणार आहे.
दरम्यान, वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कारासह अन्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. “व्हीएसआय’चे उपाध्यक्ष, विश्वस्त आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी ही माहिती दिली.
सभेमध्ये सभासद कारखान्यांना आणि विभागवार जास्तीत जास्त ऊसाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना ऊस भूषण, राज्यस्तरीय ऊस भूषण, साखर कारखान्यातील आणि संस्थेमधील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना वैयक्तिक, साखर कारखान्यांना विभागवार तांत्रिक कार्यक्षमता, सर्वोत्कृष्ण ऊस विकास आणि संवर्धन, सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, सर्वोत्कृष्ट आसवनी, सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन, नावीन्यपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम कारखाना, सर्वोत्कृष्ट उद्योजक कारखाना यांना विविध पुरस्कार दिले जाणार आहेत.
पुरस्कार
सर्वोत्कृष्ट पर्यावरण संर्वधन पुरस्कार : दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड (आलेगाव, ता.दौंड)
सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार : सोमेश्वर साखर कारखाना (सोमेश्वरनगर, ता.बारामती )
सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना (कागल, जि.कोल्हापूर)