Pune | रमजानसाठी नियमावली जाहीर; घरातच नमाज पठण करण्याचे आवाहन

पुणे – शहरातील वाढता करोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेऊन मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजान साधेपणाने आणि करोना नियंत्रण नियमावलीची अंमलबजावणी करून साजरे करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी रमजानसाठी नियमावली जाहीर केली असून रमजान महिना संपेपर्यंत ही नियमावली लागू असणार आहे. तसेच तिचे पालनही बंधनकारक करण्यात आले आहे.

अशी आहे पालिकेची नियमावली :
पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तार साठी मस्जिद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करावे. नमाज पठणाकरिता मशिदीत किंवा मोकळ्या जागेत येऊ नये. सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेच्या नियमांचे पालन करून पवित्र रमजान महिना साजरा करावा. रमजान काळात मुस्लिम बांधव 30 दिवस पहाटे पासून उपवास ठेवतात व संध्याकाळी मगरीब नमाज पूर्वी तो सोडतात.

या सेहरी व इफ्तारच्या वेळी अनेक फळ, अन्न पदार्थ या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी संबंधित प्रभागाचे सहाय्यक महापालिका आयुक्त व पोलीस प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी. रमजान महिन्यातील शेवटच्या शुक्रवारी दुवा पठण करण्याची प्रथा आहे. त्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात मशिदीमध्ये येतात. परंतु, यावेळी कोरोनाचा वाढता पाहता आपापल्या घरातूनच दुवा पठण करावे. शब-ए-कदर ही पवित्र रात्र रमजान महिन्यात मुस्लिम नागरिक तरावीह नमाज संपल्यानंतर आपल्या विभागातील मशिदीमध्ये रात्रभर कुराण व नफील नमाज अदा करतात.

परंतु,यंदा हे कार्यक्रम घरीच साजरे करावेत. धार्मिक स्थळे बंद असल्याने वाझ कार्यक्रमाचे आयोजन शासनाच्या नियमांचे पालन करून बंद जागेत शक्‍यतो ऑनलाइन पद्धतीने करण्यात यावे. महापालिका क्षेत्रात संचारबंदी लागू असल्याने फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत व नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. रमजान महिन्यात कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.