पुणे – मंगळवारी आरटीओला सुट्टी

पुणे – लोकसभा निवडणुकीसाठी दि. 23 रोजी मतदान असल्याने शासनाने स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे दि. 23 रोजी ड्रायव्हिंग लायसन्सची चाचणी होणार नाही. त्यादिवशी ज्या उमेदवारांची चाचणी होणार होती, त्यांनी पुढील सात दिवसांमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी चाचणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

त्याचबरोबर ज्या वाहनचालकांच्या हलके मोटार वाहन संवर्गातील लर्निंग लायसन्सची मुदत मे 2019 अखेरपर्यंत संपणार आहे, अशा उमेदवारांकरिता दि. 19 रोजी भोसरी येथील आयडीटीआर येथे विशेष शिबिराचे आयोजन केल्याची माहिती कार्यालयाकडून देण्यात आली. यामध्ये सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अपॉईंटमेंट घेणे आवश्‍यक आहे. अपॉईंटमेंट घेताना “कॅम्प आयडीटीआर 8′ या पर्यायसह दिनांक आणि वेळ निवडून चाचणीसाठी उपस्थित राहणे आवश्‍यक आहे, असेही आरटीओकडून नमूद करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.