पुणे – बालमृत्यु रोखण्यासाठी रोटा व्हायरस लसीकरण मोहीम

जिल्हास्तरावरील प्रशिक्षण पूर्ण

पुणे – जिल्ह्यातील बालमृत्यु दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारतर्फे नवजात बालकांना “रोटा व्हायरस’ लस देण्यात येणार आहे. त्यानिमित्त गुरूवारी (दि. 2) जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी लसीकरण विभागाचे सह संचालक डॉ. डी. एन.पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीनंतर आता जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात “रोटा व्हायरस’ ही लस नियमित लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे. त्याबाबत डॉ. दिलीप माने म्हणाले, “डायरिया आणि अतिसारामुळे होणारे बालमृत्यु रोखले जावेत, यासाठी ही लस महत्त्वपूर्ण आहे. जुलाब, उलट्या, न्यूमोनिया आणि कुपोषण ही बालमृत्युची प्रमुख कारणे आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी वयवर्षे दीड महिन्यांवरील बालकांना ही लस मोफत देण्यात येणार आहे.’ यावेळी डॉ. डी.एन.पाटील, डॉ. दिलीप माने, डॉ. अशोक नांदापूरकर, डॉ. खाडे, डॉ. अजित कारंजकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना या लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.