पुणे – मध्यवस्ती ही शहराची मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे हा परिसर सतत गजबजलेला असतो. परिणामी गेल्या अनेक वर्षांत या रस्त्यावर नवीन ड्रेनेज लाइन, पाण्याची लाइन टाकता आलेली नव्हती. या वाहिन्या जुन्या आणि जीर्ण झाल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन स्थायी समिती अध्यक्ष म्हणून पुढील २० ते ३० वर्षांचा विचार करून भूमिगत ड्रेनेज लाइन आणि जलवाहिन्या टाकण्यात आल्या.
पुढील काळात जुन्या पुण्याच्या सौदर्यांला धक्का न लावता हे सर्व रस्ते माॅडर्न करण्यात येणार असल्याची माहिती भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांनी दिली. शुक्रवार पेठ परिसरातील पदयात्रेदरम्यान त्यांनी मतदारांशी संवाद साधला.
रासने यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचे नागरिक, तसेच व्यावसायिकांकडूनही कौतुक करण्यात आले. रासने यांच्या प्रचारार्थ भाऊसाहेब रंगारी गणपती, जोगेश्वरी मंदिर, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, मेट्रो स्टेशन, आंग्रेवाडा, अकरा मारुती चौक, चिंचेची तालीम, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, सुभाषनगर, अत्रे सभागृह या परिसरात ही प्रचारफेरी काढण्यात आली.
अशोक येनपुरे, रूपाली ठोंबरे- पाटील, स्वरदा बापट, उज्ज्वला गंजीवाले, दिलीप काळोखे, सोहम भोसले, दिलीप पवार, अनिल बेलकर, अशोक कदम, प्रणव गंजीवाले, पंकज मोने, नंदकुमार जाधव, अनिल पवार, मुकेश राजावत, विजय नाईक, अनिल तेलवडे, राजू ठिगळे, कल्याणी नाईक, अनिता वाघ, इंदिरा निगडे, मयूर गांधी आदी याप्रसंगी उपस्थित होते.
या वेळी रासने म्हणाले, की शहरातील मध्यवस्तीत समांतर असलेला बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्ता हे रस्ते मध्य वस्तीतील सर्वांत मोठ्या बाजारपेठेला जोडतात. या रस्त्यावरील जुन्या इमारती, तसेच ऐतिहासिक वारशांना हात न लावता या रस्त्यांवरील समस्या सोडविण्यात येत आहेत.