पुणे –रिक्षांच्या भाडेदरात दि. 22 नोव्हेंबरपासून वाढ होणार असून पुणेकरांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. सध्या, पहिल्या दीड किलोमीटरच्या टप्प्यासाठी 18 रुपये दर आकारण्यात येत आहे. यात तीन रुपयांची वाढ केली असून, येत्या काळात 21 रुपये मोजावे लागणार आहेत.
शहरात मागील अनेक वर्षांपासून रिक्षा भाडेवाढ झालेली नसल्याने मागील महिन्यात दरवाढ केली होती. मात्र, काही संघटनांनी हरकत घेतल्याने ती रद्द करण्यात आली. आता सुधारित दरवाढीला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. पुणे, पिंपरी चिंचवड आणि बारामती कार्यक्षेत्रात ही दरवाढ लागू असणार आहे. नवीन भाडेदर 22 नोव्हेंबरपासून लागू होणार असल्याने, ऑटोरिक्षांचे मीटर पुन: प्रमाणीकरण (कॅलिब्रेशन) करणे बंधनकारक आहे. यासाठी 22 नोव्हेंबर ते 31 जानेवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी दिली.
रात्रीच्या वेळी जादा भाडे…
महापालिका क्षेत्रासाठी (पुणे आणि पिंपरी-चिंचवड) रात्री 12 ते सकाळी 5 या कालावधीसाठी 25 टक्के अतिरिक्त भाडेदर लागू राहणार आहे. ग्रामीण भागासाठी रात्री 12 ते सकाळी 5 या वेळेत 40 टक्के अतिरिक्त भाडेदर लागू राहणार आहे. प्रवाशांसोबत असणाऱ्या अतिरिक्त सामानासाठी (60 बाय 40 सेमी आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या 3 रुपये जादा भाडे द्यावे लागणार आहे.
सध्याचे भाडेदर जुने भाडे / नवीन भाडे/ वाढीव रुपये
पहिल्या 1.5 किमी.
साठी किमान देय भाडे 18.00/- 21.00/- 3.00/-
त्यापुढील प्रत्येक
किमीसाठी देय भाडे1 2.31/- 14.00/- 1.69/-