पुणे- प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातरर्फे पुण्यातील तीन आसनी ऑटोरिक्षांकरिता 22 नोव्हेंबरपासून भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. यामुळे ऑटोरिक्षांचे मीटर पुनःप्रमाणीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. हे पुन: प्रमाणीकरण सुरळीतपणे पूर्ण होण्यासाठी प्राधिकरणातरर्फे मीटर तपासणी ट्रॅकचे विकेंद्रीकरण करण्यात आलेले आहे.
प्राधिकरणातर्फे मीटर तपासणीसाठी चार ट्रॅक निश्चित करण्यात आले असून, त्यामध्ये ओंकारेश्वर नदीपात्रातील रस्ता, फुलेनगर, आळंदी रस्ता चाचणी मैदान, रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट, इगलबर्ग कंपनी, लेन नं.3 आणि दिवे (पासिंग वाहने) या ठिकाणांचा समावेश आहे.
या मीटर तपासणी ट्रॅकवर 25 नोव्हेंबरपासून पासून सकाळी सात ते दहा या वेळेमध्ये ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे कामकाज करण्यात येणार असून, रिक्षाचालकांनी केलीब्रेशन पूर्ण झालेल्या ऑटोरिक्षा मीटर तपासणीसाठी नजीकच्या ट्रॅकवर सादर कराव्यात, असे आवाहन प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे.