धनकवडी – खडकवासला विधानसभा मतदारसंघातील भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार भिमराव तापकीर यांच्या गाव भेट दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदारसंघातील जांभळी, बहुली, भगतवाडी, पोटेवाडी, सांगरून, मांडवी खुर्द, मांडवी बुद्रुक, खडकवाडी, अगळंबे, कुडजे खडकवाडी येथील नागरिकांनी त्यांच्या पदयात्रेस भरभरून प्रतिसाद दिला.
जांभळी येथे पांडुरंगाच्या दर्शनाने शुक्रवारी दौऱ्याची सुरुवात भिमराव तापकीर यांनी केली. यावेळी त्यांनी बहुली येथील नागरिकांशी संवाद साधत मतदान करण्याचे आवाहन केले. भगतवाडी येथे विठ्ठलसेवा मंडळाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर पोटेवाडी तसेच सांगरुण येथे पांडुरंग दर्शन घेत त्यांनी मांडवी खुर्द येथे नागरिकांशी संवाद साधला. खडकवाडी, अगळंबे खडकवाडी, कुडजे खडकवाडी येथे पदयात्रा पोहचताच नागरिकांनी भिमराव तापकीर यांचे उत्साहात स्वागत केले.
यावेळी माजी उपमहापौर दिलीप बराटे, कृषी उत्पादन बाजार समिती संचालक दत्ताभाऊ पायगुडे, उद्योजक गजानन पायगुडे, राजाभाऊ जोरी, संतोष चोरघे, पुणे ग्रामीण उपाध्यक्ष सचिन पायगुडे तसेच भाजपा ग्रामीण अध्यक्ष नवनाथ तागुंदे, महिला अध्यक्ष दिपाली वाव्हळ आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रकल्पांसाठी कटिबद्ध…
गावभेटी दरम्यान आमदार भिमराव तापकीर यांनी त्यांच्या कार्यकाळातील विकास कामांचा आढावा नागरिकांसमोर मांडला. आगामी काळातही शाश्वत विकास आणि गावांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.