Pune Metro : पुणेकरांसाठी तयार करण्यात आलेली मेट्रो आता पुणेकरांची लाडकी बनली आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी मेट्रोने प्रवास करत आहेत. यामुळे मेट्रोला चांगले उत्पन्न मिळत आहे. विविध सुविधा देखील मेट्रोकडून प्रवाशांना दिल्या जात आहेत. अशातच आता एक मोठा बदल पुणे मेट्रोने केला आहे. मेट्रो स्थानकात प्रवेश केल्यानंतर आणि बाहेर पडताना एफसी (AFC) गेट्स आधीपासून बंद असणार आहेत. मेट्रोने प्रवास करण्यासाठी स्थानकात तिकिट खिडकीत जाऊन तिकीट काढता येते. मोबाईवरील अॅपवरून देखील अॅानलाइन तिकिट काढू शकता. स्थानकात काही मशिन्स आहेत त्यावरून देखील तिकीट काढू शकता. तिकीट काढल्यानंतर प्लॅटफॅार्मवर जाण्यासाठी AFC गेट्सवर तिकीट स्कॅन करावे लागते. नवीन बदलानुसार तिकीट स्कॅन करताना AFC गेट्स आधीपासून बंद असणार आहेत. तिकीट स्कॅन केल्यानंतरच AFC गेट्स उघडतील. हा बदल आजपासून अंमलात आणला जाणार असल्याचे पुणे मेट्रोकडून सांगण्यात आले आहे. आजपासून पुणे मेट्रो स्थानकात प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना असणारे एएफसी (AFC) गेट्स आधीपासून बंद असतील आणि तुम्ही तिकीट स्कॅन केल्यावरच ते उघडतील. हा बदल आजपासून अंमलात आणला जाणार आहे. जेव्हा प्रवासी आपले तिकीट किंवा कार्ड मशीनवर स्कॅन करतील, तेव्हाच हे दरवाजे उघडतील आणि… pic.twitter.com/GnCiIrtnr6 — Pune Metro Rail (@metrorailpune) March 3, 2026 मेट्रोकडून काय सांगण्यात आले आहे? आजपासून पुणे मेट्रो स्थानकात प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना असणारे एएफसी (AFC) गेट्स आधीपासून बंद असतील आणि तुम्ही तिकीट स्कॅन केल्यावरच ते उघडतील. हा बदल आजपासून अंमलात आणला जाणार आहे. जेव्हा प्रवासी आपले तिकीट किंवा कार्ड मशीनवर स्कॅन करतील, तेव्हाच हे दरवाजे उघडतील आणि प्रवाशांना आत जाता येईल. हेही वाचा : Shankar Mahadevan Birthday: इंजिनिअर ते संगीतसम्राट… शंकर महादेवन यांचा ‘ब्रेथलेस’ प्रवास