पुणे – आरोग्य विभागाच्या माहितीनुसार अन्य रोगांच्या तुलनेत स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव यावर्षी कमी झाला आहे. पुणे शहरात या वर्षी एच-1एन-1 इन्फ्लूएंझा किंवा स्वाइन फ्लूचे केवळ पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष साथीच्या रोगाकडे वळल्याने स्वाइन फ्लूच्या घटना आणि रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
स्वाइन फ्लू संसर्ग किंवा एच-1एन-1 इफ्लूएंझा प्रामुख्याने डुकरांमध्ये आढळतो. यात ताप, आळस, शिंका येणे, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे आणि भूक कमी होणे या लक्षणांचा समावेश होतो.
या वर्षी एकूण 6 हजार 350 रुग्णांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली असून, 3 हजार 016 रुग्णांना टॅमीफ्लूची तपासणी करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या (पीएमसी) आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 3 हजार 016 रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी केवळ पाच पॉझिटिव्ह आले आहेत.
शहरात स्वाइन फ्लूची कोणतीही प्रकरणे नोंदवली गेली नाहीत. गेल्या वर्षी आम्ही शहराच्या हद्दीत स्वाइन फ्लूची जवळपास 79 प्रकरणे नोंदवल्याचे महापालिकेच्या साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.