पुणे : शिक्षण हक्क कायदा अर्थात “आरटीई’अंतर्गत खासगी शाळांमध्ये राखीव २५ टक्के जागांमधून प्रवेश प्रक्रियेची सोडत (लाॅटरी) सोमवार, दि. १० फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे ही प्रक्रिया
“आरटीई’ अंतर्गत दि. २ फेब्रुवारीपर्यंत असलेल्या या मुदतीदरम्यान राज्यातील एक लाख जागांसाठी तब्बल तीन लाख पाच हजार अर्ज आले आहेत. यात सर्वाधिक ६१ हजार अर्ज पुणे जिल्ह्यातून दाखल झाले आहेत. या सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास आॅनलाइन उपस्थित राहावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी केले आहे. यंदा राज्यभरातील आठ हजार ८६३ शाळांमध्ये हे प्रवेश होणार आहेत.
या जागांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १४ जानेवारीला सुरू करण्यात आली. यासाठी २७ जानेवारीपर्यंत मुदत होती. मात्र, नंतर ही मुदत २ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली.