पुणे – मेट्रो बाधित नागरिकांचे पाच ठिकाणी पुनर्वसन

मेट्रोच बांधून देणार घरे, दुकाने : 71 जण होणार बाधित

पुणे – महामेट्रोच्या बुधवार पेठ (फडके हौद) येथील भुयारी मार्गाच्या स्थानकामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी महामेट्रोकडून पाच जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. त्यात 2 जागा खासगी मालकीच्या असून तीन जागा महापालिकेच्या मालकीच्या आहेत. या जागांवर निवासी तसेच व्यावसायिक बांधकामे जागा मालक तसेच भाडेकरूंना उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती मेट्रोच्या भुयारी मार्गाचे प्रभारी प्रकल्प व्यवस्थापक अतुल गाडगीळ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

महामेट्रोच्या रेंजहिल्स ते स्वारगेट हा 7 किलो मीटरचा भुयारी मार्ग असणार आहे. या मार्गाचे काम सुरू केल्यानंतर फडके हौद येथे असलेल्या जागेत. या भुयारी मार्गातून येणाऱ्या टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) बाहेर काढल्या जाणार आहेत. त्यासाठी या ठिकाणी मेट्रोस जागा हवी आहे. या शिवाय, याच मार्गातील मंडई येथील स्थानकाच्या ठिकाणीही काही घरे तसेच व्यावसायिक दुकाने बाधित होत आहेत. महामेट्रोने केलेल्या सर्वेक्षणानुसार, फडके हौद येथे सुमारे 225 जण बाधित होत आहेत. तर मंडई परिसरात 71 जण बाधीत होणार असून या दोन्ही ठिकाणी 61 आहे. तर उर्वरीत रहिवासी आहेत. या नागरिकांशी महामेट्रोची चर्चा सुरू असली तरी, या नागरिकांकडून याच परिसरात पुनर्वसन करून देण्याची मागणी महामेट्रोकडे करण्यात आली आहे. त्यानुसार, महामेट्रोने कसबा पेठेत महापालिकेची भाई कोतवाल मंडई तसेच दादोजी कोंडदेव शाळेच्या परिसरात घरे तसेच व्यावसायिक गाळे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तर मंडई स्थानकाच्या बाधितांसाठी शनिवार पेठ येथील झाशीची राणी शाळेसह, कादंबरी अपार्टमेंट आणि पीडीसीसी बॅंकेच्या जागा निश्‍चित केली आहेत. त्यानुसार, या पाच ठिकाणी सुमारे 382 निवासी घरे तर 106 व्यावसायिक गाळे बांधले जाणार आहेत. त्यानुसार, या बाधितांचे पुनर्वसन केले जाणार आहे.

मेट्रोच उलचणार खर्च
या बाधितांचे संपूर्ण पुनर्वसन महामेट्रोकडून केले जाणार असून त्यांना या बाधित मिळकती मोफत बांधून दिल्या जाणार आहेत. महामेट्रोने केलेल्या सर्वेक्षणानुसार, यात भाडेकरून तसेच जागा मालकांनाही मोबदला दिला जाणार आहे. तर ज्यांची व्यावसायिक दुकाने आहेत. त्यांना त्यांच्या दुकानापेक्षा अधिकचे बांधकाम करून दिले जाणार आहे. या पाचही ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या प्रत्येकी आठ मजली असणार आहेत. तर एक खोली, हॉल आणि किचन तसेच हॉल, किचन आणि बेडरूम अशा स्वरुपात असणार असून ती 250 चौरस फुटांपासून ते 500 चौरस फूटांपर्यंत असणार असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले. या नागरिकांना ही माहिती व्हावी यासाठी प्रत्येक नागरिकाशी स्वतंत्ररित्या संवाद साधण्यात येत असल्याचेही गाडगीळ यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.